शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका 32 वर्षीय महिलेवर 6 महिन्यात 8 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपीमध्ये 1) माऊली पवार 2) रज्जाक पठाण, 3) काळु वाकुंज 4) विठ्ठल काळे, 5) राजेश उर्फ पप्पु गायकवाड 6) आकाश गायकवाड 7) संदीप वाळुंज व 8) नवनाथ वाळुंज अश्या 8 जणांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मजकूर यांनी पिडीत महीला विधवा, भोळसर व एकटी राहत असलेचा फायदा घेऊन एप्रिल व मे 2021 मध्ये व त्यानंतर नक्की तारीख व वेळ आठवत नाही या दरम्यान घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदीकिनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी एक एकट्याने तिचे इच्छे विरुध्द तिचे संमतीशिवाय जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा अधिक तापस अंमलदार म पो स ई चरापले प्रभारी अधिकारी पो नि सुरेशकुमार राऊत हे करीत असून यातील पाच आरोपीना गुन्ह्य़ामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळालेली आहे .