आ.राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त शेतकऱ्यांना हंडाळ परिवाराकडून 1 लाख रुपयांची मदत

केडगाव : मागील महिन्यात मुसळधार पावसाने  राज्यातील शेतकरी वर्गाचं अतोनात नुकसान केलं होतं. यात अनेकांच्या जमिनी, घरे वाहून गेली होती. त्यामुळे आमदार राहुल कुल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कुणीही हार, नारळ, शाल यावर खर्च न करता याचे पैसे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावेत असे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत केडगावचे माजी सरपंच, भीमा पाटस कारखान्याचे विद्यमान संचालक आणि महालक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक आप्पासाहेब पाराजी हंडाळ यांनी १ लाख रुपयांची मदत आमदार राहुल कुल यांच्याहस्ते या शेतकरी बांधवांना पाठवली आहे. त्यावेळी त्यांचे पुत्र राहुल हंडाळ आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता. आमदार राहुल कुल यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी पीडित शेतकऱ्यांना मदत पाठवली मात्र सुमारे एक लाख रुपयांची रोख मदत पाठवून आप्पासाहेब हंडाळ यांनी पिडीत शेतकऱ्यांची मने जिंकली आहेत.

यावेळी बोलताना अप्पासाहेब हंडाळ म्हणाले, आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही भेटवस्तू न आणता  पावसात शेती, घर गमावलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन केले होते. त्यामुळे माझ्या हंडाळ परिवाराच्या वतीने आम्ही १ लाख रुपयांची मदत आमदार राहुल कुल यांच्या सुपूर्द केली.