केडगाव : चौफुला (बोरिपार्धी) येथील रेणुका कला केंद्रामध्ये दि.14 ऑक्टोबर रोजी एका तरुणावर चौघाजणांनी कोयत्याने वार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याबाबत यवत पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिपार्धी गावच्या हद्दीत असणाऱ्या चौफुला येथील रेणुका कला केंद्रामध्ये साहील बापु जाधव (वय 19, वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. पाटस, दौंड) याला आरोपी आदिनाथ उर्फ आदित्य ईश्वर गिरमे, रोहीत राजू भिसे (दोघे रा.पाटस, दौंड) व त्यांचे दोन अनोळखी मित्र अश्या या चौघांनी फिर्यादीस ‘तु पाटस टोलनाक्यावर रागात का पाहत होता’ असे म्हणुन त्या चौघांनी त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, मानेवर व दोन्ही हातावर जिवे मारण्याच्या उद्देशाने सपासप वार केले.
या घटनेनंतर आरोपी हे तेथून पळून गेले. फिर्यादीने झालेला सर्व प्रकार यवत पोलिसांना सांगितल्यानंतर फिर्यादीच्या जबाबावरून वरील चार आरोपिंवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज हे करीत आहेत.







