अब्बास शेख

दौंड : दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचा वाढदिवस आज राज्यभरातून आलेल्या मान्यवरांच्या शुभेच्छांनी चांगलाच चर्चेत आला. राज्यातील अनेक आजी, माजी मंत्री, आमदार तसेच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार राहुल कुल यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जयकुमार गोरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री नितेश राणे, आमदार सुरेश खाडे, संग्राम थोपटे, संजय जगताप, विक्रम पाचपुते, राहुल बोराडे यांसह अनेक आजी माजी मंत्री, आमदारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, माझे विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अश्या शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या तर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…! अश्या शब्दांमध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्री जयकुमार गोरे यांनीही आमदार राहुल कुल यांना शुभेच्छा देताना, दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार माझे सहकारी मित्र श्री. राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आई अंबाबाईच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली ही वाटचाल सदैव सुरु राहो, हीच सदिच्छा ! अश्या विशेष शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या.
आमदार राहुल कुल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त हार, नारळ, बुके न आणता पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत करावी असे आवाहन केले होते. त्यानुसार आज त्यांच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी धनादेश, आर्थिक मदत तसेच विविध पदार्थ, किराणा आणि इतर संसारपयोगी मदत आमदार राहुल कुल यांच्याकडे सुपूर्द केली.







