भीमा पाटस कारखान्याची 46 लाखांची फसवणूक, आठ जणांवर गुन्हा दाखल

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे असणाऱ्या भीमा पाटस म्हणजेच एम.आर.एन. भीमा शुगर अँड पावर लिमिटेड पाटस साखर कारखान्याची सुमारे 46 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. याबाबत संभाजी दादासाहेब देशमुख (फिल्डमन एम.आर.एन भीमा शुगर अँड पॉवर लिमिटेड, पाटस) यांनी फिर्याद दिली आहे.

फिल्डमन संभाजी देशमुख यांच्या फिर्यादीवरून
सचिन शंकर भिलारे (भिलारवाडी, बीड) सोमनाथ भगवान सुळसकर (शिवूर, अहिल्यानगर) अंकुश गणपत चव्हाण (पिंपरी, हवेली) हनुमंत भाऊसो रुपनवर (दापोडी, ता.दौंड) सोमनाथ विश्वनाथ रुपनवर (दापोडी, ता.दौंड) शंकर विनायक देशमुख (पुसद, यवतमाळ) रवींद्र नामदेव चव्हाण (कुसुमतेल, नाशिक) सुभाष रूपा राठोड (चिंचोटी, बीड) या आठ कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मागील हंगाम 2023-2024 या सालाकरिता वरील आरोपी कंत्राटदार यांनी कारखान्यासोबत कायदेशीर करारनामा करुन चेक स्वरूपात तसेच बँक आरटीजीएस ने एकुण 46 लाख 36 हजार रुपये रक्कम घेतली मात्र या आरोपिंनी करारनाम्याचे उल्लंघन करत कारखान्याची आर्थिक फसवणूक केली असे फिर्यादित म्हटले असून याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रेड पोसई गाडेकर हे करीत आहेत.