दौंड मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमावर बलात्काराचा गुन्हा दाखल

दौंड : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दौंड मधील एका नराधमावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल शिंदे (रा.डिफेन्स कॉलनी, दौंड) असे गुन्हे दाखल आरोपीचे नाव आहे.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने दौंड मधील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छे विरोधात लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडिता गरोदर राहिल्याने तिने आरोपी विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ करीत आहेत.