पुणे : ऐन सणासुदीत व्हॉट्सअॅप डाउन झाले आहे. मेसेज जात नाहीत, लोक ट्विटर आणि फेसबुकवर समस्या शेअर करतआपली व्यथा मांडू लागले आहेत. याबाबत मेटा ने ही सेवा लवकरच रिस्टोर होऊन सुरु होईल असे जाहीर केले आहे.
ऐन सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये, लोक घरी बसून आपल्या नातेवाईक आणि मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना आज मंगळवारी अचानकपणे सर्वांचे लोकप्रिय असणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप डाउन झाले आहे. आज मंगळवारी दुपारी बारा वाजल्यापासून लोकांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात अडचणी येत आहेत. सोशल मीडिया ट्विटरवर लोकांनी याबाबत तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.
मात्र तरीही व्हाट्सअप सुरु झाले नसल्याने आता वैतागलेल्या लोकांनी याबद्दल खूप मजेदार मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे.