दौंड : दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 17 पैकी 14 जागा बिनविरोध झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता पुन्हा एकदा या निवडणुकीत ट्वीस्ट आले असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जल्लोष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव येथील अपक्ष उमेदवार नारायण जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मोहन टुले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता येथील लढत ही एकतर्फी होणार आहे.
तर वरवंड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय धायगुडे यांना अपक्ष उमेदवार व खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप चे सचिन सातपुते असा थेट सामना येथे होणार आहे.
या पिंपळगाव आणि वरवंड दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षातील नाराजांची समजूत घालण्यात यश आले असून आधीच जड असलेले राष्ट्रवादीचे पारडे आता अधिकच जड आणि एकतर्फी होत चालल्याचे दिसत आहे.