पुणे : नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रम काही प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे हा नियोजित कार्यक्रम उद्या होणार नसल्याचे जाहीर केले गेले आहे.
उद्या येथे जो कार्यक्रम होणार होता त्यामुळे येथे कोणतीही व्यक्ती, संस्था, आयोजक यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण करता येणार नव्हते. तसे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले होते मात्र येथे कार्यक्रम होणार नसल्याने आता हे आदेश रद्दबातल समजले जाणार आहेत.
उद्या होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सद्य स्थितीवर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द झाला असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.