याला म्हणतात राजकारण | पहाटेचा शपथविधी हि एक खेळी, जेष्ठ नेते शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पहाटेचा शपथविधी हा सस्पेन्स बनून राहिला आहे. यावर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर केलेले एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

जेष्ठ नेते शरद पवार यांना पहाटेच्या शपथविधीबद्दल पत्रकारांनी विचारले असता ‘पहाटेचा शपथविधी हि एक खेळी होती, त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीबद्दल त्यांना माहिती होती हे अधोरेखित झाले आहे.

23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी अचानकपणे भाजप, राष्ट्रवादी युती होऊन सरकार स्थापनेचा शपथविधी सोहळा पार पडल्याची बातमी आली आणि सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली होती. यावर मोठे राजकीय रणकंदन माजले होते. या शपथविधीबद्दल अजित पवार किंवा शरद पवार कधीच खुलून बोलले नव्हते मात्र देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि शपथविधीची शरद पवारांना कल्पना होती हि माहिती बाहेर आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. त्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.