भिगवण : भिगवण पोलीसांनी दमदार कामगिरी दाखवत चोरी करणारे अटल गुन्हेगार जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडुन ४५,१३०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १७/०९/२०२२ रोजी भिगवण गावच्या हद्दीमध्ये पोलीस रात्रगस्त करत असल्याच्या दरम्यान दोन संशईत इसम आपले अस्तित्व लपवुन आंधारामध्ये फिरत असताना मिळुन आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांचेजवळ एक लोखंडी धारदार कोयता, लोखंडी गज, एक ज्युपिटर मोटार सायकल मिळुन आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते अगोदर उडवाउडविची उत्तरे देवु लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांची नावे १) चैतन्य पांडुरंग शेळके, (वय २० वर्ष,) २) किशोर सहदेव पवार, (वय २० वर्ष दोघे रा. भोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) असे असल्याचे सांगितले. तसेच
त्यांचे जवळ मिळुन आलेली ज्युपिटर मोटार सायकल ही त्यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीतून चोरी केल्याचे व शिरूर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये ट्रॅक्टर चालकाला अडवुन त्यास मारहाण करून त्याच्या
जवळील रोख रक्कम व ट्रॅक्टर जबरीने चोरी केल्याची कबुली दिली. तर त्यांचे जवळ मिळुन आलेले मोबाईल हे त्यांनी परंडा येथुन चोरी केल्याची कबुल केले.
या आरोपिंवर भिगवण पोलीस स्टेशन
येथे गुन्हा रजि. नंबर. २३० / २०२२, मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे कारवाई करून त्यांचेकडुन ४५,१३०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आला आहे. आरोपी नामे १) चैतन्य पांडुरंग शेळके, वय. २० वर्ष, २) किशोर सहदेव पवार, (वय. २० वर्ष, दोघे रा. भोत्रा, ता.परांडा, जि. उस्मानाबाद) यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे आणले उघडकीस आणले आहेत.
१) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. २३०/२०२१, मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२
(२) शिरूर पो.स्टे. गुन्हा रजि. नं.३०८ / २०२२ भादवि कलम ३९२, ३४ ( फरारी )
३) वारजे माळवाडी पो.स्टे. पुणे शहर, गुन्हा रजि. नं. ३३४/२०२२ भादवि कलम ३७९ ( फरारी )
४) परांडा पो.स्टे., जि. उस्मानाबाद, गुन्हा रजि. नं. २७५/२०२२ भादवि कलम ३७९ ( फरारी )
५) परांडा पो.स्टे., जि. उस्मानाबाद, गुन्हा रजि. नं. २५८/२०२१ भादवि कलम ३२४, ३२३, ५०६, ३४ (फरारी )
६) बारामती तालुका पो.स्टे, गुन्हा रजि. नं.७६७/२०२०, भादवि कलम ३७९, ३४
७) यवत पो.स्टे, गुन्हा रजि. नं. १०६२/२०२०, मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२
सदरची कामगिरी मा. डॉ. अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहीते सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस
अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सचिन कांडगे, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, अजित सरडे, होमगार्ड आप्पा सातपुते, लक्ष्मण ढवळे, पोलीस मित्र रवी काळे, सिधु आळंदकर, अशोक सुळके यांनी केली आहे.