दौंड : भुखे को अन्नदान और प्यासे को पानी या उदात्त हेतूने दौंड शिवसेनेच्या वतीने व माजी नगरसेविका अनिता दळवी व गणेश दळवी यांच्या पुढाकाराने गणेश विसर्जनाच्या निमित्ताने येथील गांधी चौकात गणेश भक्तांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.
गणेश विसर्जनासाठी आलेल्या मंडळांसाठी व मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांसाठी सकाळी 12 ते रात्री बारा वाजेपर्यंत अन्नदानाचा उपक्रम सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मा. नगराध्यक्ष शितल कटारिया यांच्या हस्ते गणेशाची आरती करून उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, नंदू पवार, इंद्रजीत जगदाळे, राजेंद्र खट्टी, अनिल सोनवणे, गोविंद अग्रवाल, मतीन शेख ,सचिन कुलथे, अशोक जगदाळे, कैलास शहा आदी मान्यवर उपस्थित होते. दौंड शिवसेनेच्या वतीने दरवर्षी गणेश विसर्जना दिवशी सदरचा अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येतो. गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेले गणेश भक्त या उपक्रमाचा लाभ घेतात.