Sad News : वृत्तपत्र जगताला मोठा झटका , मुरलीधर बाबा शिंगोटे यांचे निधन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दैनिक पुण्य नगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, कर्नाटक मल्ला या वर्तमानपत्राचे संस्थापक  मा.श्री.मुरलीधर बाबा शिंगोटे यांचे आज वृद्धापकाळाने दुपारी १:०० वाजता दु:खद  निधन झाले.

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या बाबांनी जुन्नर मधून मुंबईत जाऊन आपला पत्रकारितेतील वेगळा ठसा उमटवला होता.

साधे राहणीमान आणि उच्च विचार सारणी ही बाबांची खासियत होती. कुठेही गाडी थांबवून वडापावच्या हातगाडीवर जाऊन वडापाव खात खात परिसराची आणि विविध विषयांची माहिती करून घेणारे बाबा सर्वांनाच भावत होते. शून्यातून जग निर्माण करणे कशाला म्हणतात याचे बाबा  हे उत्तम उदाहरण होते. बाबांच्या जाण्याने त्यांच्या परिवारासह संपूर्ण वृत्तपत्र जगतालाही अपार दुःखद झटका बसला आहे. बाबांच्या जाण्याने पत्रकारितेतील एक दिग्गज तारा निखळला आहे, आणि ती उणीव भरून निघणे कदापि शक्य नाही.

बाबा शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांना राज्यभरातून विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.