दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव (सालू मालू) येथे एक विचित्र घटना घडली आहे. दोन महिलांनी पारगाव येथील एका बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यांना पैसे मोजून देतो असे म्हणून एका बहाद्दराणे ते पैसे मोजण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन थेट पोबारा केला. मात्र खुटबाव जवळ तो अपघातीरीत्या सापडला असल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळत आहे.
ही घटना पारगाव येथील एका बँकेत आज दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे समजत असून दोन महिला बँकेतून पैसे काढून त्या मोजत असताना एक इसम त्यांच्याजवळ आला आणि मी पैसे मोजून देतो असे म्हणत हातात पैसे घेऊन मोजून देण्याच्या बहाण्याने त्याने थेट तेथून पोबारा केला.
संबंधित इसम पैसे घेऊन पळाल्यानंतर या महिलांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर नागरिकांनी त्याला पकडण्यासाठी आजूबाजूला त्याचा शोध घेतला असता तो वाहणाने पळून गेल्याचे लक्षात आले. तो इसम भरधाव वेगात खुटबाव च्या पुढे जात असताना कशाला तरी धडकून जखमी झाल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे पारगाव च्या बँकेतून महिलांचे पैसे घेऊन पळाला अण खुटबाव जवळ अपघाताने लागला गळाला अशी गत त्याची झाली आहे. घटनास्थळी यवत पोलीस पोहोचले असून त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरु आहे.