Ramdan Eid – रमजान ईद, नमाज घरातच साजरी करा : गृहविभाग



| सहकारनामा |


मुंबई : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा कहर सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध सण, उत्सव (Ramdan Eid) साजरे करण्यावर या आधीच सरकारने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार सर्व उत्सव, सण हे घरातच आणि साध्या पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गृहविभागाकडून रमजान ईद (Ramdan Eid 2021) साठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

या नुसार शुक्रवार दि. 14 मे रोजी रोजी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी होत असून हि ईद शासनाच्या 13 एप्रिल 2021 च्या आदेश आणि तरतुदींच्या अधिन राहून विशेष खबरदारी घ्यावी आणि प्रत्येकाने रमजान ईद आणि नमाज हि घरातच पठण करावी अशा सूचना यात करण्यात आल्या आहेत.

रमजान ईद च्या सणानिमित्त गृह विभागाने खालीलपैकी सूचना केल्या आहेत…

● कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आणि त्याचा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग पाहता पवित्र रमजान ईदची नमाज, नियमित नमाज, तरावीह तसेच रोजा इफ्तार मशिदीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन  करावे

● नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र जमू नये.

● रमजान ईद निमित्ताने होणाऱ्या खरेदीचे स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे काटेकोर पालन व्हावे आणि त्या वेळे व्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी होऊ नये, एकत्र जमू नये.

● राज्यात कलम 144, संचारबंदी असल्यामुळे फेरीवाले, स्टॉल लावू नये, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये.

● रमजान ईद निमित्ताने मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

● धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने घरातच साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.

● रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर यांचा  वापर करण्याबाबत काळजी घ्यावी.

● कोरोना महामारी covid 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेही अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत.