कोंढव्यात 6 गोदामांना आग, सर्वत्र जाळ अण धूर..

पुणे : पुण्यातील कोंढवा येथील पारगे नगर परिसरात ५ ते ६ गोदामांना आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

कोंढवा परीसरात मोठी आग

याबाबत सर्वप्रथम वृत्त ANI ने दिले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये सायंकाळी आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीमध्ये सुमारे 6 गोदाम जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. हि आग नेमकी कशामुळे लागली आणि यात नेमके किती नुकसान झाले हे अजून समजू शकले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम सुरु आहे. अधिक वृत्त थोड्याच वेळात देत आहोत.