दौंड नगरपालिकेवर काढणार हंडा मोर्चा, लहुजी शक्ती सेनेचा इशारा

दौंड : मातंग समाजाच्या विविध प्रश्नासाठी दौंड नगरपालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा नगरपालिका मुद्दामपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात येऊन नगरपालिकेच्या या भूमिकेविरोधात नगरपालिकेवर हंडा मोर्चा आंदोलन करणार असल्याचा इशारा लहुजी शक्ती सेना संघटनेने दिला आहे. आंदोलनाचे निवेदन दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना देण्यात आले.

दौंड मधील अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील समस्यांकडे व प्रश्नांकडे नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या परिसरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणी वर आला आहे. येथे पाण्याची समस्या भेडसावत आहे. अशा समस्यांकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा निषेध म्हणून लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगरपालिकेवर हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

संघटनेचे पदाधिकारी शुभम साळवे ,अनिल खंडाळे ,नरेश ससाने ,अमित मोरे, चंद्रकांत लोखंडे, आकाश ससाने तसेच योगिता रसाळ व पदाधिकारी उपस्थित होते.