ईव्हीएम (EVM) मशीन चोरीला, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : सासवड (पुणे) येथील जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम मशीनची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम पैकी १ कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.