दौंड : दौंड तालुक्यातील आंबेगांव पुनर्वसन (केडगाव) येथील श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. या सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संतोष पांडुरंग देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी प्रविण मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल विका सोसायटीच्या मा.चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीसाठी सर्व संचालकांना सुचित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांनी दिनांक २०/०१/२०१४ रोजीच्या आदेशास अनुसरून श्री विठ्ठल विका. सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार चेअरमन व व्हा. चेअरमन या पदाच्या निवडीकरीता अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या व्यवस्थापक समिती सदस्यांची सभा रविवार दि. २९/०९/०२४ रोजी दुपारी ठिक ०२.०० वाजता मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, दौंड या ठिकाणी आयोजित केली होती.
यावेळी संस्थेचे संचालक येथे उपस्थित राहून त्यांनी संस्थेच्या संचालकामधून चेअरमनपदी संतोष पांडुरंग देशमुख व व्हा.चेअरमनपदी प्रविण मोरे यांची बिनविरोध निवड करत असल्याचे जाहीर केले. यावेळी नवनियुक्त चेअरमन संतोष देशमुख तसेच व्हा.चेअरमन प्रविण मोरे यांनी बाळासो सदाशिव पायगुडे, किसन शंकर कडु, तान्हाजी राघु काळभोर, शरद बळी धुमाळ, मोहन सखाराम गोडावळे, मारुती आनंदा कडु, अरुण बाळासो निढाळकर, गणेश विठ्ठल चव्हाण, श्रीमती शारदा मारुती तळेकर, श्रीमती बबई साधु बेनगुडे तसेच बाळासाहेब कडू, प्रविण धुमाळ, किसनभाऊ कडू, दत्तात्रय कडू, बबन तळेकर, बबन बेनगुडे, बंडासो कडू यांचे विशेष आभार मानले.
श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सह.सोसा. लि.आंबेगाव या संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून एस.एम. गव्हाणे यांनी कामकाज पाहिले.