सावधान | दौंड तालुक्यात चोऱ्यांमध्ये वाढ ! देऊळगावगाडा येथे लोखंडी दरवाजा तोडून 2 लाख 75 हजारांची चोरी

दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथे चोरट्यांनी घराचा लोखंडी दरवाजा तोडून घरातील महिलेला कोयत्याचा धाक दाखवत सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत श्रीमती लिलाबाई हनुमंत बारवकर (वय 55 वर्ष व्यवसाय शेती रा. देऊळगावगाडा, (बारवकर वाडी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.१६/०१/२०२४ रोजी रात्री १ः०० च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देऊळगावगाडा (ता.दौड, जि.पुणे) गावच्या हद्दीत असणाऱ्या बारवकरवाडी येथे लिलाबाई बारवकर यांच्या राहत्या घराचा लोखंडी दरवाजाचा आणि कुलूप लावलेला कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडुन घरातप्रवेश केला.

यावेळी फिर्यादी यांना या दोन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवुन घरातील २ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम, गळ्यातील ६७ हजार ५०० रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची पोत, व रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावत चोरून पळुन गेले.