चोरट्यांनी व्यापाऱ्याची लुटून नेलेली लाखो रुपयांची रक्कम दौंड पोलिसांनी केली व्यापाऱ्याकडे सुपूर्द

दौंड : दौंड शहरातील किराणा मालाचे घाऊक व्यापारी सुखेजा आपले दुकान बंद करून घरी जात असताना दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील 19 लाख रुपयांची पिशवी लुटून नेली होती. दौंड पोलिसांनी संशयित सहा जणांच्या विरोधात दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला होता.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून अत्यंत वेगाने व नियोजित तपास करीत अवघ्या बारा तासात आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून 9 लाख 82 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले होते. दौंड पोलिसांच्या या कामगिरीची जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दखल घेत तपास पथकाचा विशेष सत्कार केला होता. आज दि. 21 फेब्रुवारी रोजी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून दौंड पोलिसांनी व्यापारी सुखेजा यांची हस्तगत केलेली रक्कम (मुद्देमाल) त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे .

या वेळी दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड , पोलिस उपनिरीक्षक महेश आबनावे, सुशील लोंढे , शहाजी गोसावी, भगवान पालवे , सतीश राऊत, सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे , जाधव , पोलीस हवालदार पांडुरंग थोरात , सुनील सस्ते , सुभाष राऊत , सचिन बोराडे , अमोल गवळी, अमोल देवकाते , किरण डुके, आदेश राऊत, अभी गिरमे , रवी काळे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.