Crime – दरोडा व खंडणी गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या



दौंड : दरोडा व खंडणीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील, मागील तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपींना दौंड पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले.

 अनिकेत अरविंद सोनवणे (रा. वडार गल्ली, दौंड) हा एक महिन्यापासून फरार होता तर निलेश गणेश कदम (रा. सिद्धार्थ नगर, दौंड) हा मागील तीन वर्षापासून पोलिसांना चकवा देत होता.या दोघांना पकडण्यात येथील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.दि.30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून या आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींवर शासकीय कामात अडथळा करणे, दरोडा, घरफोडी,आर्म ऍक्ट, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो. उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पो. हवा. सुभाष राऊत, पो. ना. अमोल गवळी, किरण राऊत, आदेश राऊत, सचिन बोराडे, पो. कॉ. अमोल देवकाते, रवींद्र काळे यांच्या पथकाने सदरची कामगिरी पार पाडली.