दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागाला आज थोडाफार दिलासा मिळाला आहे.
आज दि. 11 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार 76 जणांपैकी फक्त एकजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण खडकी येथील असून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी माहिती दिली आहे.
यवत आणि स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये सुमारे 76 जणांचे स्वॅब टेस्ट करण्यात आले होते त्या पैकी फक्त खडकी येथील 33 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आढळून आला तर 75 जण निगेटिव्ह आले आहेत.