दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये असणाऱ्या एका कंपनीतील एकाच कुटुंबातील सुमारे 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. याबाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली आहे.
हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत असून यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलीसह 2 स्त्रिया आणि 2 पुरुषांचा देखील समावेश आहे.
हे सर्वजण केडगाव परिसरामध्ये असणाऱ्या एका कंपनीतील आहेत. यामध्ये अगोदर यातील एका इसमाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याच्या घरातील इतर 5 जणांचे स्वॅब घेण्यात येऊन ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या सर्वांचा आज अहवाल आला असून आता एकाच घरात 6 जण कोरोना बाधित झाल्याने केडगावकरांच्या चिंता मात्र वाढल्या आहेत.