दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना आपले जाळे विनतच आहे. येथील स्थिती बिकटच बनत चालली आहे.
आज 23 जुलै रोजी पुन्हा 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यामध्ये
बोरीपार्धी 1, खुटबाव 1, तर बोरिभडक येथील 2 जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.
या कोरोना बाधितांमध्ये 3 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. एकूण 34 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या होत्या पैकी 30 निगेटिव्ह तर 4 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कोरोना व्हायरस आता ग्रामीण भागात घेरत चालला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यास याचा आणखीन फैलाव होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.