दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगाव, वरवंड, पाटस आणि भांडगावमधील 6 जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली असून याबाबतची सविस्तर माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.19 ऑगस्ट रोजी 61 जणांचे स्वॅब प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी 6 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये केडगाव 2, वरवंड 2, पाटस 1, भांडगाव 1 अशी गावनिहाय आकडेवारी देण्यात आली आहे.
या भागामध्ये कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या कमालीची चिंता निर्माण झाली आहे. कोरोना बधितांचा हा आकडा कधी थांबणार असा भाबडा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिक विचारू लागला आहे.