दौंड च्या भाजी मंडईत हाणामारी, 10 जणांना अटक

दौंड : दौंड शहराच्या भाजी मंडईत एकमेकांशी वाद घालून शिवीगाळ, मारहाण करून आरडाओरडा करणाऱ्या दहा जणांवर दौंड पोलिसांनी गुन्हा दखल करत त्यांना अटक केली असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, दौंड शहराच्या भाजी मंडईत दोन गटात वाद सुरु असल्याची बातमी दौंड पोलिसांना समजल्यानंतर तात्काळ दौंड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी दोन्हीही गटात मारामारी सुरु होती. आरोपींनी एकमेकांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून जोरात आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांनी दोन्हीही गटाच्या लोकांना बाजूला घेऊन दौंड पोलीस ठाण्यात आणले. भांडणाचे कारण विचारल्यावर त्यांनी 'फळाच्या दुकानासमोर थांबल्याने किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे सांगितले.

करमचंद बंडगर यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी वाहिद हाशम शेख (रा.विठ्ठलवाडी मंदिरासमोर दौंड), रफिक अब्दुल रहेमान बागवान (रा.गांधीचौक इंदिरानगर), सलमान गफार शेख (रा.गांधीचौक इंदिरानगर), अफजल इस्लाम शेख (रा.साईबाबा मंदिर आग्रवाल शाळेशेजारी दौंड), बिट्टू कुमार अनिल मोदी (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), फंटूस कुमार प्रकाश यादव (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), शंकर कुमार निरंजन माहतो (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), कारू कुमार निरंजन माहतो (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), पप्पू महेश चौधरी (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), अशा दहा जणांवर भा.द.वी. कलम १६०,३२३,५०४,५०६, महाराष्ट्र कायदा कलम ११०,११२,११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान सुभाष राऊत, अमीर शेख, करम बंडगर, योगेश पाटील, किरण पांढरे आदींनी केली आहे.

अन्यथा अशांवर होणार कारवाई!
‘कुणीही सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नये. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही असे प्रकार घडत असतील तर अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही नागरिकांबाबत असे काही त्रास देण्याचे प्रकार होत असतील तर नागरिकांनी याबाबत तक्रार करावी.
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक