बारामती : सहकारनामा ऑनलाईन
कोर्टाच्या आवारात पोलिसांना व्हिडीओ शूटिंग काढण्याच्या किरकोळ वादातून वकील आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी एक वकील आणि अन्य कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कामासाठी आज त्यांना कोर्टात हजर केले गेले त्यावेळी एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ शूटिंग करत असल्याचे उपस्थित वकिलांच्या निदर्शनास आल्यानंतर वकिलांनी याबाबत कोर्टाच्या आवारात बेकायदा शूटिंग करू नका असे सांगितले गेले मात्र त्या पोलिसाकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप वकिलांनी करत त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर उपविभगायीय पोलीस अधिकारी तेथे हजर झाले. त्यानंतर तेथील प्रतिष्ठित वकील आणि अधिकारी यांच्याबरोबर शिवीगाळ झाली या बाचाबाची नंतर हे येथेच न थांबता त्याचे पर्यावसन हाणामारी मध्ये झाले. आणि दोन्ही बाजूने तुफान मारामारी झाली. पोलिसांनी काही वकिलांना ताब्यात घेतले असून अद्याप त्यांच्यावर काय कारवाई झाली हे समजले नाही. मात्र या प्रकारानंतर वकील संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून पोलीस कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान वकील संघटना पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे समजत आहे.