बारामती : (सहकारनामा ऑनलाइन)
वेगवेगळ्या विषयावर पक्षांची वेगवेगळी मते असू शकतात. मात्र आम्ही महाविकासआघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगी विकासासाठी एकत्र आलो आहोत. आणि आमच्यात मतभेद असण्याचे काहीच कारण नाहीये अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटी बाबत बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली असून काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सुरुवात होणार असल्याने
आज मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापानाचा कार्यक्रम असून आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचे सांगितले.