केडगाव येथे गादि कारखान्याला आग लागून सात लाखांचे नुकसान



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील केडगाव येथे गादी कारखान्याला आग लागून सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे. ही आग आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास लागली असून यामध्ये कारखान्यातील सर्व मशिनरी, गाद्या आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे.



आग लागल्याची माहिती मिळताच केडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले असून दुपारी दोन वाजेपर्यंत आग विझलेली नव्हती. यावेळी केडगावचे ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी दौंड नगरपालिकेत केडगाव येथील आग लागल्याची माहिती देऊन आग विझविण्यासाठी त्वरित अग्निशमन बंब पाठविण्यात यावा आहि विनंती केली त्यावरून नगरपालिकेकडून अग्निशमन बंब रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.