भाजप आमदार ‘जयकुमार गोरे’ यांच्या वाहनाचा भीषण ‘अपघात’, बरगडीला ‘मार’ लागल्याने ‘आमदार’ गंभीर जखमी!

पुणे : भाजप चे आमदार जयकुमार गोरे (Bjp Mla Jaykumar Gore) यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात आमदार जयकुमार गोरे (Mla Jaykumar Gore) यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले असून आमदार जयकुमार गोरे यांच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले असल्याचे माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत गाडीत असणारे अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवारी पहाटे 3:30 वाजता हा अपघात झाला आहे. गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या 40 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली. अपघातानंतर जखमी झालेले आमदार जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तर या अपघातात जखमी झालेल्या इतर लोकांना बारामतीतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जयकुमार गोरे हे भाजपचे आमदार असून ते आपल्या फॉर्चूनर गाडीतून आपल्या सहकारऱ्यांसह दहिवडी गावाकडे जात होते. पुणे-पंढरपूर रस्त्यावरील फलटण शहरातून जात असताना त्यांची कार अचानक असंतुलित होऊन एका स्मशानभूमीजवळील खड्ड्यात पडून हा भीषण अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यालयाकडून आवाहन

आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला असून त्यातून ते सुखरूप बचावले आहेत. आता त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे. गाडीतील इतर लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती बरी आहे. सध्या पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार घेत असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कुटुंबीय त्यांच्या बरोबर आहेत.

आमदार श्री. जयकुमार गोरे कार्यालय