वृत्तसंस्था –
कोरोना महामारीने आपले रौद्र रूप धारण करत संपूर्ण जगालाच वेठीस धरले आहे. आता या महामारीचा प्रादुर्भाव विविध सेलिब्रिटी, मान्यवर व्यक्तींना झाला असून आता हाती आलेल्या वृत्तानुसार श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ANI नेही या वृत्ताला दुजोरा दिला असून महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोना
मिळत असलेल्या माहिती नुसार नृत्यगोपाल दास यांना श्वासनाबाबत थोडासा त्रास जाणवत होत होता त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट केल्या नंतर मात्र त्यांना कोगोनाची बाधा झाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.
महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली आहे आणि श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र के अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास के कोरोना संक्रमित होने की सूचना प्राप्त हुई। उन्हें त्वरित चिकित्सकीय सुविधा उपलब्ध कराने हेतु मेदांता अस्पताल के डॉ.नरेश त्रेहन से वार्ता की है। प्रभु श्री राम से उनके शीघ्र स्वास्थ्य लाभ हेतु प्रार्थना है असे ट्विट केल्याचे ANI ने म्हटले आहे.
CM योगी आदित्यनाथ यांची माहिती