बारामती : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे बारामतीमधील राजकीय वातावरण तप्त होऊ लागले आहे. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना धमकावले जात असल्याचे समोर येत असून बारामती शहरातही इच्छुक उमेदवाराला धमकावून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहीत आत्माराम बनकर हे प्रगतीनगर (आदित्य प्राईट बारामती जि. पुणे) येथे घरी असताना आरोपी बाबू पवार (रा. दुर्गा टॉकीज समोर बारामती) रोहन (पूर्ण नाव माहित नाही, रा. खंडोबानगर, बारामती) व इतर पाच आरोपी यांनी त्यांच्या घरी येवुन काही कारण नसताना तु लोकसभेचा फॉर्मकसा भरतो ते बघतो व भरला तर तुला जिवानिशी खल्लास करेन अशी धमकी देवुन फिर्यादीच्या नाकावर फाईटरने फाईट मारून जखमी केले. यावेळी रोहन याने फिर्यादीचे हात धरले तर बाबु पवार याने त्यांचा गळा दाबून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
तसेच माझ्या जिवाला काही धोका झाल्यास बाबु पवार व त्याचे सोबत असेलेले आरोपी जबाबदार राहतील असे फिर्यादीने फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.