लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, रक्तदान शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित, कष्टकरी उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे असा संदेश देणारे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात अभूतपूर्व अशा जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने येथील संघटनांच्या वतीने रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मूर्ती संस्था (पूर्ण कृती पुतळा समिती) दौंड, मातंग समाज एकीकरण समिती दौंड शहर व तालुका तसेच दौंड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील येथील अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये भव्य अभिवादन सभा तसेच समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मा.आमदार रमेश थोरात, पोलिस निरीक्षक संतोष डोके, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुषमा शिंदे, आप्पासो पवार, नामदेव ताकवणे ,मा. नगराध्यक्ष बादशाह शेख, नागसेन धेंडे, अश्विन वाघमारे,बी.वाय. जगताप, अनिल सोनवणे तसेच मा. नगरसेवक ,विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना आपल्या मनोगतातून अण्णाभाऊंच्या महान विचारांचा व कार्याचा आढावा घेतला.

सध्याच्या युवा पिढीने अण्णाभाऊंचे विचार आत्मसात करून त्यांची अंमलबजावणी करावी असे मार्गदर्शनही केले. अण्णाभाऊ साठे उद्यानात उभारण्यात येणारे स्मारक व उद्यानातील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आली.
जयंती उत्सव समितीचे यावर्षीचे अध्यक्ष सागर लोखंडे, धीरज दिवटे, सागर सोनवणे, सागर सुरेश लोखंडे ,साहिल खंडाळे आदींनी उत्सवाचे आयोजन केले. आबा वाघमारे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले.

लहुजी यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष नितीन तूपसौंदर्य यांच्या पुढाकाराने संघटनेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली होती. यावेळी आमदार राहुल कुल, मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया ,आर.पी.आय. पक्षाचे चे महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे पदाधिकारी सतीश थोरात,अकबर शेख आदींनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लहुजी यंग ब्रिगेड च्या वतीने आरोग्य शिबिर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित साहित्य ग्रंथ दिंडी, समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश तूपसौंदर्य, शुभम तूपसौंदर्य ,अनिकेत मोरे, गणेश खुडे, गणेश ससाणे, बाबू खुडे, निखिल ससाणे, महेश गायकवाड तसेच सदस्यांनी उत्सवाचे आयोजन केले.