अख्तर काझी
दौंड : दौंड ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.दि.19 एप्रिल 2022 रोजी सांगली येथे झालेल्या सभेमध्ये अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज व हिंदू धर्माच्या संस्कार व संस्कृतीबाबत टीका टिपणी केली. मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना भडकविणा रे भाषण केले आहे, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेली आहे म्हणून ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने त्यांचा जाहीर निषेध करत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने यावेळी करण्यात आली. अमोल मिटकरी यांचा निषेध करताना येथील सावरकर स्मृतिस्तंभ (मृत्युंजय प्रतिष्ठान) समितीचे अध्यक्ष विवेक गटणे म्हणाले, अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत बोलण्याचे काहीच कारण नाही, आम्ही त्यांच्या धर्माबाबत काही बोलत नाही त्यामुळे त्यांनाही इतर धर्माबाबत बोलण्याचा अधिकार नाही.
देवदत्त शिनोलीकर, सुधीर गटणे,अर्चना साने,विकास देशपांडे, अनंत जोगळेकर यांनीही आपल्या भाषणातून मिटकरी यांचा निषेध केला.
ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष गोपाळराव नगरकर,रघुवीर अंतरकर,बाळकृष्ण पाठक, योगेश चापोरकर, अजय लेले,श्रीराम ग्रामपुरोहित, रेखा तारे आदि उपस्थित होते.