‛हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली

दौंड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने गतवर्षीप्रमाणे यंदाही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे.

या अभियानाच्या निमित्ताने दौंड तालुक्याचे आमदार ॲड.राहुल सुभाष कुल यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजता बोरमलनाथ मंदिर, चौफुला येथून निघून तिची सांगता डीएड कॉलेज, मधुकरनगर पाटस येथे होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‛हर घर तिरंगा’ अभियानाला दौंड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिकांच्या घरावर ‛तिरंगा’ दिमाखात फडकताना दिसत आहे. दि. १३ ऑगस्ट रोजी सूर्योदयानंतर तिरंगा फडकविण्यात आला असून दि. १५ ऑगस्ट रोजी सूर्यास्तापूर्वी तिरंगा राष्ट्रध्वज उतरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.