दौंड : दौंड तालुक्यात सर्रास विजचोरी करण्याच्या घटना घडत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी आता महावितरण सर्सावले असून दौंड तालुक्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे.
काल एकाच दिवसात पाच जणांवर विजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून यात पिंपळगाव येथील नारायण दशरथ जावळे, दत्तात्रय मारुती शेलार व विठ्ठल भिकू मगर यांचा समावेश असून पडवी येथील गोरख दशरथ सुतार, वरवंड येथील देवराम बाबुराव जगताप या सर्वांवर भारतीय विद्युत कायदा कलम 135 अंतर्गत विजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत महावितरण चे सहायक अभियंता संतोष पोपट करनोर यांनी फिर्याद दिली असून यवत पोलिस ठाण्यात वरील इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.