|सहकारनामा|
पुणे : उरुळी कांचन येथील सुप्रसिद्ध असलेल्या हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे यांच्यावर रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यामध्ये रामदास आखाडे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे CCTV फुटेज सहकारनामा च्या हाती लागले असून या फुटेजमध्ये एक हल्लेखोर तलवारीने रामदास आखाडे यांच्यावर सपासप वार करताना दिसत आहे.
VIDEO – पहा व्हिडीओ : रामदास आखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
रामदास आखाडे यांच्यावर रविवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरुन 3 हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सांगितले जात होते मात्र cctv फुटेज मध्ये एक हल्लेखोर आखाडे यांच्यावर तलवारीने सपासप वार करून पळताना दिसत आहे.
आखाडे यांच्यावर हल्ला कोणी व का केला याबाबत तर्कवितर्क लावले जात असून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटना स्थळी पोहचून त्यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती मिळत आहे.
अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात
रामदास आखाडे हे गंभीर जखमी झाले
असून त्यांना लोणी काळभोर येथील
विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.