डॉ.अशोक जाधव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव; तब्बल ६१ पुरस्कारांचे मानकरी

पुणे : आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने पत्रकार भवन, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक बाबुराव जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

तमाशा आणि लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. अशोक जाधव यांनी आपल्या कार्यातून सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, डॉ. जाधव हे आजपर्यंत तब्बल ६१ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास सिनेअभिनेत्री पायल उप्पल, अभिनेत्री राधा सागर तसेच संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाचे राज्यमंत्री मा. ज्ञानेश्वर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सन्मानामुळे डॉ. अशोक जाधव यांच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील योगदानाचा गौरव झाला असून, त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.