Murder : रस्त्याच्या वादातून कासुर्डीत एकाचा खून



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे रस्त्याच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या खून प्रकरणी संदीप भिवा कोळपे, (वय -27 वर्षे, रा.कासुर्डी, माळवाडी, ता.दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

यवत पोलिसांनी या खून प्रकरणी सोमेश्वर भागुजी ठोंबरे (रा.कासुर्डी, ता.दौंड, जि.पुणे) यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.30/11/2020 रोजी सकाळी 10 च्या सुमारास कासुर्डी गावच्या हद्दीत असणाऱ्या माळवाडी, ता.दौंड, जि.पुणे येथे फिर्यादी यांच्या घरा जवळील देवराम ठोंबरे यांचे शेतात बक-यांच्या तळाजवळ सोमेश्वर भागुजी ठोंबरे (रा.कासुर्डी, ता.दौंड, जि.पुणे) याने त्याच्या घराजवळुन फिर्यादी यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून फिर्यादी यांचे वडील भिवा सिदु कोळपे (वय. 55 वर्षे, रा.कासुर्डी, ता.दौंड, जि.पुणे) यांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांचे डोके मोटार सायकलवर तिन वेळा आपटुन त्यांचा खुन केला आहे अशी फिर्याद संदीप कोळपे त्यांनी दिली आहे.

सदर फिर्यादिवरून यवत पोलिसांनी सोमेश्वर ठोंबरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनाची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, तसेच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी धस यांनी भेट देऊन माहिती घेतली.