कोरेगाव भीमा जयस्तंभ अभिवादनाबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी केले नागरिकांना ‛हे’ आवाहन, युट्युब आणि फेसबुकवर Live प्रक्षेपण



पुणे- सहकारनामा

कोरेगाव (भिमा) येथील १ जानेवारी रोजीचा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महा संचलनालयाच्या वतीने फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत प्रशासनाकडून 

फेसबुक चॅनल http://www.facebook.com/MahaDGIPR  आणि युट्यूब  चॅनल

http://www.youtube.com/MaharashtraDGIPR ही लिंक शेअर करण्यात आली आहे.

नागरीकांनी घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. 

याशिवाय सह्याद्री वाहिनीवरून देखील प्रसारण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

फेसबुक चॅनल http://www.facebook.com/MahaDGIPR ही लिंक असून युट्यूब  चॅनलची

http://www.youtube.com/MaharashtraDGIPR अशी लिंक देण्यात आली आहे.