दौंड’मध्ये 81 वर्षीय माऊलीची कोरोनावर मात, डॉक्टरांचेही मोठे योगदान



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंडमध्ये आणखीन एका ८१ वर्षीय माऊलीने कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान यांच्या मातोश्री फुर्शीद खान (वय, ८१वर्ष) यांनी वीस दिवस चाललेली कोरोना विरुद्ध ची लढाई जिंकून त्यावर मात केली आहे. 

फुर्शीद खान या दि. २० जुलै पासून आजारी होत्या, सुरुवातीला त्यांच्यामध्ये निमोनिया आजाराची लक्षण आढळली. पहिल्या कोरोना तपासणीमध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र तब्येत जास्तच खालावली असल्याने येथील डॉ मीनल वागजकर व डॉ. समीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पिरॅमिड दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

दरम्यान त्यांचा दुसरा कोरोना अहवाल हा पॉझिटिव आला व खान यांची तब्येत आणखीनच गंभीर बनली, अक्षरशः यांची शुद्ध सुद्धा हरपली होती परंतु डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी व फुर्शीद खान यांच्यातील मोठ्या इच्छाशक्ती मुळे त्यांनी अखेर कोरोना विरुद्धची लढाई जिंकलीच. आज  त्या पूर्णपणे बऱ्या होऊन  सुखरूप घरी परतल्या आहेत.