दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यामध्ये कोरोना आपले हातपाय पसरतच असल्याचे विविध अहवालांवरून समोर येत आहे. आज 7 ऑगस्ट रोजी पुन्हा 6 गावांतील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इरवाडकर यांनी दिली.
पॉझिटिव्ह आलेल्या या गावांमध्ये केडगाव 2, खामगाव 1, देलवडी 1, भांडगाव 1, सहजपुर 1, पिंपळगाव 1 अश्या 8 गावांचा समावेश आहे.
एकूण 39 जणांचे स्वॅब देण्यात आले होते त्यापैकी 31 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत