भांडगाव, पाटस, कुरकुंभला पुन्हा कोरोनाचा हादरा, 61 पैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील भांडगाव, पाटस, कुरकुंभला येथे पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले असून सुमारे 61 जणांच्या करण्यात आलेल्या  कोरोना टेस्ट पैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दुःखद बाब म्हणजे या पाचजणांपैकी एकाचा कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सहकारनामा’ला दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दौंड तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही नागरिक मात्र कोरोनाला गंभीरपणे घेताना दिसत नाहीत.

त्यामुळे एक प्रकारे कोरोना महामारीला खतपाणी घालण्याचे काम होत आहे. यातूनच हा रोग उग्ररूप धारण करत असून यामुळे आता या तालुक्यात मृत्यूही व्हायले लागले आहेत ही मोठी चिंतेची बाब आहे.