दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यातील यवत कोविड सेंटरमध्ये दि. 1/10/2020 रोजी 37 लोकांचे स्वॅब घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत पाठविले होते. या 37 स्वॅबपैकी 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देलवडी – 01, केडगाव – 03, सहजपूर -02
भांडगाव -01, दहिटणे -01 असे एकूण 08 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांचे वयोमान हे 25 वर्षे ते 67 वर्षे या दरम्यान असून यात 05 पुरुष आणि 03 महिलांचा समावेश आहे.