दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील 5 गावांचा दोन दिवसांचा अहवाल आज प्राप्त झाला असून या अहवालामध्ये एकूण 5 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.13 ऑगस्ट रोजी 64 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते त्यामध्ये 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले त्यामध्ये केडगावमधील 42 वर्षीय महिला, यवतमधील 38 वर्षीय महिला तसेच बोरीपार्धी येथील 59 वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे.
दि. 14 ऑगस्ट रोजी एकूण 51 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी राहू येथील 4 वर्षीय मुलाला तर वरवंड येथील 70 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.