केडगाव, राहू, यवत’ला पुन्हा कोरोना झटका, 37 पैकी आज इतकेजण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाला उतरती कळा लागली असल्याचे समोर येत असताना आता कोरोनानेही थेट तालुक्यातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या केडगाव, राहू आणि यवत या 3 गावांना पुन्हा झटका दिला आहे.

यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील 3 गावांमध्ये प्रत्येकी 1 असे 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण 37 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती त्यापैकी 34 जण निगेटिव्ह आले तर उर्वरित 3 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये केडगाव 34 वर्षीय महिला, राहू शिंदेनगर 53 वर्षीय पुरुष, यवत 43 वर्षीय पुरुष अशी गावनिहाय आकडेवारी आहे.