दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील बोरीपार्धीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. बोरीपार्धी येथील एका इसमाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनाही याची बाधा झाली आहे तर आज पुन्हा त्या इसमाच्या संपर्कात आलेल्या एका 18 वर्षीय युवतीस कोरोनाची लागण झाली आहे.
याबाबतची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सहकारनामा ला दिली आहे.
या परिसरातील एकूण 52 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी त्या पैकी बोरीपार्धी येथील ही 18 वर्षीय युवतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.