दौंड शहर आणि परिसरात 10’ कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 28/8/2020 रोजी एकुण 59 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती.  त्यांचे रिपोर्ट अर्ध्या तासात प्राप्त झाले असून या 589 पैकी एकूण 10 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 49 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 3

महिला आणि 7 पुरुषांचा समावेश असून या सर्वांचे वय हे 26 ते 48 या दरम्यान आहे.

पॉझिटिव्ह आलेले रुग्ण  हे नानविज pts 4, एस आर पी एफ ग्रुप 7 – 1,

आर पी एफ ग्रुप 5 – 1, पाटस 1, लिंगाळी 1, आणि दौंड शहर 2 या प्रभागातील आहेत.