दौंड मधून युवक बेपत्ता, पोलिसांचे आवाहन

अख्तर काझी

दौंड : शहरातील नटराज कॉलनी (तुकाई नगर) येथील 23 वर्षीय युवक बेपत्ता झाला असल्याची घटना समोर आली आहे. विष्णू गोविंद संगेपान (वय 23,रा. नटराज कॉलनी,तुकाई नगर दौंड) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.

सदर घटनेची माहिती बेपत्ता युवकाच्या भावाने दौंड पोलिसांना दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार दि.11 जुलै रोजी विष्णू हा घरातील लोकांना काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दौंड पोलिसांनी विष्णू बेपत्ता झाला असल्याची नोंद पोलिस दफ्तरी केली आहे.

बेपत्ता व्यक्तीचे वर्णन –
नाव – विष्णू गोविंद संगेपान, उंची 5 फूट 2 इंच, रंग सावळा, मध्यम शारीरिक बांधा , केस काळे, चेहरा उभट, बेपत्ता व्यक्तीने पांढरा रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केली आहे.
बेपत्ता युवक कोणाच्या निदर्शनास आल्यास पोलीस प्रशासनाला (02117-262333) या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केले आहे.